Pune
08048050185
+918698282507

शोधन व्याख्या: शोधनं शमनं चेति द्विधा तत्रापि लंघन...

शोधन व्याख्या: शोधनं शमनं चेति द्विधा तत्रापि लंघनम् । यदिरयेद्बहिर्दोषान् पञ्चधा ‘शोधन’ च तत्। (वा.सु.14/4) विधी भेदाने लंघन चिकित्सेचे- शोधन आणि शमन असे २ प्रकार होतात. पैकी, शोधन म्हणजे- ‘यत् उदीरयेत बहिः- बहिर्निष्कासयेत् दोषान् शब्दशःअर्थ-प्रकुपित दोषांना शरिराबाहेर काढणे. प्रधान कर्म -परम शोधनौषधि शरिरजानां दोषाणा क्रमेण परमौषधम । बस्तिर्विरेको वमनं । (वा.सु.1/25) ‘वात पित्त कफ’ या शारीर दोषांसाठी क्रमशः ‘बस्ती-विरेचन-वमन’ हे ‘परम शोधन उपाय’ आहेत चरकोक्त पंचकर्म-शिरोविरेचन, वमन, विरेचन, निरुह, अनुवासन पञ्चधा शोधनं च तत्-निरुहो वमनं कायशिरोरेकोऽस्त्रविस्त्रुति:। (वा.सु.14/4) वाग्भटोक्त पंचशोधन कर्म-निरुह, वमन, विरेचन, शिरोविेचन, रक्तमोक्षण येथे चरकोक्त पंचकर्मात-अनुवासन हे कर्म समाविष्ट असल्याने-चरकोक्त पंचकर्म चिकित्सा ही ‘प्रायशःशोधन तसेच शमन’ प्रकारची आहे. परंतु, वाग्भटोक्त पंचशोधन कर्मे ही ‘शोधन’ प्रकारचीच आहेत. स्पष्टीकरण-लंघन चिकित्सा ही अपतर्पण करणारी चिकित्सा आहे आणि शोधन चिकित्सा हा लंघनाचा प्रकार आहे. म्हणजेच, शोधनामध्ये दोषशोधनातून अपतर्पण होणे अपेक्षित आहे. म्हणून, पंचकर्मातील ‘अनुवासन’ व तत्सम संतर्पण करणारे प्रकार शोधनकर्म होत नाहीत. म्हणूनच, पंचशोधनांमध्ये ‘अनुवासन’ कर्माचा उल्लेख नाही.
 2020-04-13T02:19:15

Keywords

footerhc