Pune
+918698282507

व्यायाम आणि आयुर्वेद शरीराला स्थैर्य प्राप्त होण्...

update image
व्यायाम आणि आयुर्वेद शरीराला स्थैर्य प्राप्त होण्यासाठी तसेच शरीराचे बळ वाढविण्यासाठी केलेली विशिष्ट हालचाल म्हणजे व्यायाम होय. जलद चालणे, धावणे, पोहणे, सूर्यनमस्कार, दन्डबैठका, योगासने इ. कोणत्याही स्वरुपाच्या हालचाली म्हणजे व्यायाम. घरातच राहून सूर्यनमस्कार-योगासने करणे असू द्या किंवा गच्चीवर चालणे असू द्या, हे सर्व व्यायामाचे प्रकार आजच्या घडीला (lockdown मध्ये) अत्यंत उपयुक्त आहेत. आयुर्वेदानुसार व्यायाम हा दिनचर्येचाच एक भाग आहे.  दैनंदिन जीवनात व्यायाम किती करावा तसेच त्याचे फायदे काय? याचे वर्णन आयुर्वेदात सांगितलेले आहे. व्यायाम किती करावा- थंडीत व वसंत ऋतु मध्ये (october, november, december, january, february) व्यायाम अर्धशक्तीने करावा.इतर सर्व ऋतुत तो त्याहूनही कमी प्रमाणात करावा. कपाळ, नाक, काख, सांधे यांस घाम आला आणि श्वासवेग वाढला  म्हणजे समजावे अर्धी शक्ती व्यायाम झाला. ही लक्षणे दिसू लागल्यावर व्यायाम  थांबवावा.  याहुन अधिक व्यायाम केल्यास धातुक्षय, खोकला, श्वास इ. रोग उद्भवतात. व्यायामाचे फायदे- व्यायामामुळे शरीराला हलकेपणा येतो. कष्टांची कामे करण्याचे सामर्थ्य वाढते. जाठराग्नि प्रदीप्त होतो. चरबी कमी होते. अवयव पिळदार व बान्धेसूद होतात. आळस नष्ट होतो. शरिर बळकट होते.  प्रतिकार क्षमता वाढते. रक्ताभिसरण सुधारुन आरोग्य उत्तम राहते. व्यायाम कोणी करू नये- वाताचे-पित्ताचे त्रास असणारे, लहान बालके, वयोवृध्द, अजीर्णाने पिडीत व्यक्त्तींनी व्यायाम करु नये. lockdown मध्ये तर जरुर व्यायाम कराच आणि त्यानंतरही एक सहज वर्तणूक म्हणून व्यायामाला आपल्या दिनचर्येचा भाग बनवा.  धन्यवाद डॉ.  प्रशांत अमृतकर एम्.डी. आयुर्वेद, पुणे 8698282507
 2020-04-27T03:30:27

Related Posts

update image

Agnikarma For Chronic Elbow Pain

2025-09-13T02:41:05 , update date

 2025-09-13T02:41:05
update image

Suvarnprashan For Kids

2025-09-11T16:02:20 , update date

 2025-09-11T16:02:20
update image

Why Panchakarma Treatment?

2025-09-03T15:11:17 , update date

 2025-09-03T15:11:17
update image

Post-Delivery Piles or Fissure | Safe Ayurvedic Treatment in Pune

2025-08-31T08:04:30 , update date

 2025-08-31T08:04:30

footerhc