Pune
08048050185
+918698282507

शोधन कर्म आवश्यकता- यतेत च यथाकालं मलानां शोधनं प...

शोधन कर्म आवश्यकता- यतेत च यथाकालं मलानां शोधनं प्रति । अत्यर्थसंचितास्ते हि क्रुध्दा: स्युर्जीवितच्छिद: । वा.सु.4/26 वातादी दोष आणि पुरिषादी मल यांचे संशोधन योग्य काळी तसेच योग्य वेळेवर करण्याचा प्रयत्न करावा. कारण, अत्यधिक प्रकुपित झालेले दोष हे शरिरनाश (र्जीवितच्छिद:) करणारे ठरु शकतात. दोषा:कदाचित्कुप्यन्ति जिता लंघनपाचनै: । ये तु संशोधनै: शुध्दा न तेषां पुनरुद्भव: ।। दोषाणां च द्रुमाणां च मूलेऽनूपहते सति । रोगाणा प्रसवानां च गतानामागतिध्र्रुवा ।।(च.सु.16/20-21) लंघन-पाचनादी चिकित्सेने ‘शमन’ झालेले दोष हे (अनूकूल हेतू प्राप्त होताच) कदाचित, पुनः कुपित होवू शकतात; परंतु, वमनादी संशोधन चिकित्सेने दोषस्थानच ‘शुध्द’ झाल्याने (अनूकूल हेतू प्राप्त झाल्यावरही) सहसा, पुनः कुपित होत नाहीत. सारांश- स्वस्थ व्यक्तीने सुध्दा-वमनादी संशोधनाद्वारे, शोधन योग्य काळात शरिरशुध्दी करावी. कारण, संचय कालातच दोषांना जिंकल्यास; दोषांची प्रकोपावस्था टाळता येते.
 2020-04-15T02:43:36

Keywords

footerhc