Pune
08048050185
+918698282507

शोधन अर्हता- तत्र संशोधनै: स्थौल्य-बल-पित्त-कफाधिक...

शोधन अर्हता- तत्र संशोधनै: स्थौल्य-बल-पित्त-कफाधिकान् । (वा.सू.14/1२) वाग्भटांनुसार, जो अत्यधिक बलवान आहे; जो अधिक स्थूल आहे, तसेच, ज्यांमध्ये-पित्ताधिक्य, कफाधिक्य आहे; त्यांमध्ये संशोधन करावे. अविपाकोऽरुचि: स्थौल्यं पाण्डूता गौरवं क्लम:। पिडकाकोठकण्डूनां सम्भवोऽरतिरेव च । आलस्यश्रमदौर्बल्यं दौर्गन्ध्यं अवसादक: । श्लेष्मपित्तसमुत्क्लेशो निद्रानाशोऽतिनिद्रता । तंन्द्राक्लेब्यमबुध्दित्वमशस्तस्वप्नदर्शनम् । बलवर्णप्रणाशश्च तृप्यतो बृंहणैरपि । बहुदोषस्य लिंगानि तस्मै संशोधनं हितम् । उर्ध्वं चैवानुलोमं च यथादोषं यथाबलम् । (च.सू.16/ 1६) चरकांनुसार, उपरोक्त-अविपाकस्थौल्यादी ही बहुदोषाची लक्षणे आहेत. बहुदोषाची लक्षणे असतांना ‘संशोधन’ करणे हितावह आहे. संशोधन करतांना- ‘दोषबल आणि रुग्णबल’ याचा विचार करुन आवश्यकतेनुसार, उर्ध्वशोधन-वमन अथवा अधःशोधन-विरेचन करावे. सारांश-उपरोक्त संदर्भावरुन लक्षात येते की, ग्रंथकारांनी संशोधन हा शब्द प्राधान्याने- ‘ वमन-विरेचन’ यासाठी वापरला आहे; आणि संशोधन कोणामध्ये करावे हे ठरवितांना ‘रुग्णबलाचा’ विचार प्राधान्याने केलेला दिसतो.
 2020-04-23T03:22:28

Keywords

footerhc