Pune
08048050185
+918698282507

आयुर्वेदानुसार स्वस्थ व्यक्ती कोण? ज्याच्या शरिरा...

आयुर्वेदानुसार स्वस्थ व्यक्ती कोण? ज्याच्या शरिरात  'समदोष आणि समधातू' आहेत म्हणजेच-ज्याच्या शरिरात सर्व अवयव, अवयवांचे घटक आणि त्यांचे क्रियाव्यापार सम अवस्थेत आहेतःPerson with Balanced state of main elements of the body. ज्याचा 'अग्नि' हा 'सम' आहे म्हणजेच- ज्याला व्यवस्थित भूक लागते आणि खाल्लेले व्यवस्थित पचते: Person with Adequate Digestive power. ज्याच्या शरिरात सर्व 'मल क्रिया' सम आहेत म्हणजेच-ज्याला प्रत्येक दिवशी वेळीच व प्रमाणात लघवी व शौचास होते आणि घामही योग्य प्रमाणात येतो: Person with daily excretion of Urine, Stool and Sweat properly.  ज्याचा 'आत्मा' प्रसन्न असतो म्हणजेच-Person with Blissful condition of Soul. ज्याचे 'मन' प्रसन्न असते म्हणजेच-Person with Happy state of Mind. ज्याचे 'इंद्रिय' प्रसन्न असतात म्हणजेच-Person with Satisfied senses. स्वस्थ व्यक्तीची (Healthy Person) ही परिपूर्ण व्याख्या फक्त आयुर्वेद वैद्यकशास्त्रातच आहे. अशी परिपूर्ण व्याख्या सांगणारे हे एकमेव वैद्यकशास्त्र. मूळात, आयुर्वेद वैद्यकशास्त्राचा मुख्य आणि पहिला हेतू हा 'स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ जपणे' हाच आहे. आयुर्वेदातील उपदेशांचा आदर करुन आपणही आपले स्वास्थ जपावे. -Dr. Amrutkar's AMRUT AYU CARE, B T Kawade Rd, Pune(Call:8698282507, Visit us: www.amrutayucare.in)
 2019-07-27T17:24:19

Keywords

footerhc